तुम्हाला हॉरर सिनेमा बघायला आवडतो का? त्यात तुम्ही अचानक दरवाजा उघडताना, खुर्ची अचानक हलल्याचा, क्षणात दिवे चालू बंद होवू कुणीतरी हळूच कानात पुटपूटून गेल्याचं तुम्ही अनेकदा बघितल असाल. पण हेच सगळ जर तुमच्या आयुष्यात खरचं घडलं तर? धक्का बसेल ना पण या सारखे विचित्र प्रकार खरचं विदर्भातील अक प्रमुख जिल्हा भंडाऱ्यात होत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या कुटुंबियांच्या दाव्याप्रमाणे धान्याचे डबे, कपड्यांची कपाट यांत अचानाक पाणी भरल्याचं आढळून येत आहे. एवढचं नाही तर घरातील वस्तु आपोआप हलतात, गॅस ओट्यातून पाणी गळत, स्वयंपाकाची इलेक्ट्रिक शेगडी आपोआप खाली पडून फुटणे अशा विचित्र घटना घडत गेल्या सहा महिन्यांपासून घरात घडत असल्याचा दावा या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरी येथील एका घरात दिवसाढवळ्या अविश्वसनीय घटना पुढे आली आहे.
तरी या घटनेची दखल आता थेट अंधश्रध्दा निर्मुलन समितीने घेतली असुन ह्या घरात नेमक चाल्लय काय या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी घेतली आहे. सुमेध मेंढे कुटुंबासह राहतात. सुमेध, पत्नी, हर्षल आणि निखिल अशी दोन मुले आहेत. तीन वर्षांपासून सुमेध, पत्नी व हर्षल घरात राहत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते घडताना सुमेधचा मुलगा हर्षल आणि पुतणी व्यतिरिक्त कुणीच बघितले नाही. (हे ही वाचा:- Kolhapur Black Magic: मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू; वशीकरण, करणीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये अघोरी प्रकार)
या प्रकारचा कुठल्याही घटना घडत नसुन ही केवळ अंधश्रध्दा असल्याचं अंधश्रध्दा निर्मुलन समितीचं मत आहे. हा प्रकार कोणताही चमत्कार नसून यामागे असलेल्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गावात जाऊन शोध घेणार असल्याचे सांगण्यात आले.