संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown)असतानाही राज्यात होम क्वारंटाईनचं (Home Quarantine) उल्लंघन होत असल्याचे उघड होत आहे. क्वारंटाईनच्या शिक्का हातावर असताना बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यातच कोल्हापूर येथील आंबाबाईच्या मंदिरात हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का असणारा एक व्यक्ती आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण देशात वावरत असणारे कोरोना व्हायरसच्या संकटाला लोक गाभीर्याने घेत नसल्याचे समजत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली असून हा आकडा 122 पोहचला आहे. नुकतीच मुंबई येथे नवे 5 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या प्रत्येक देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहे.
होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत लक्ष ठेवले जात आहे. मात्र, हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर असतानाही एक व्यक्ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेली. पूजेच्या साहित्यासह गरुड मंडपात गेलेल्या या व्यतीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला थेट उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात दाखल केले. तसेच, या बेजबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोरोना व्हायरस थैमान घातले असून नागरिकांनी घरातच बसावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत. तरीदेखील लोक घराबाहेर पडत असल्यामुळे राज्यात संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री संपूर्ण देशात लॉकडाउन केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 6 जणांची वाढ, राज्यातील एकूण आकडेवारी 122 वर पोहचली
कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सामाजिक दुरावा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत होते. यातच देशभरातील करोनाचा प्रदुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये 21 दिवस लॉकडाउनची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने यासंदर्भात आवाहन करणारा एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये सिंम्बा चित्रपटामधील रुक जा रे बंदेया हे गाणे वापरुन नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे.