ऑक्टोबर महिन्यात मुंबई मध्ये अचानक काही तास तास खंडीत झालेला वीजपुरवठा हा सायबर हल्ला होता असे संकेत काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना दिली आहे. दरम्यान काल नागपुर मध्ये पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या सायबर गुन्हे आणि हल्ले अशा घटना वाढत चालल्या आहेत. याबाबत प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. अनेकांना मुंबईत झालेला तो नेमका ब्रेकडाऊन कशामुळे होता हा प्रश्न पडला होता. त्याला सायबर एक्सपर्ट्नी उत्तर दिलं आहे. हा सायबर हल्ला असल्याची माहिती त्यांनी देताना उर्जा विभागाला कळवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई मध्ये 12 ऑक्टोबरच्या सकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला होता. तेव्हा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडीत होण्यामागे काही तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर सप्लायचा कळवा येथील ग्रीडफेल्युयर झाले होते. ज्यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
आता मुंबई मधील हा खंडीत झालेला वीजपुरवठा सायबर हल्ला असल्याचा अंदाज झाल्याने मुंबई पोलिस दलाचं सायबर विभाग देखील कामाला लागलं आहे. लवकरच या प्रकरणातील पुढील अपडेट्स काय असतील याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.