जळगाव (Jalgaon) महिला वसतिगृहातील महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा लज्जास्पद प्रकार आज अधिवेशनात भाजप आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांनी उचलून धरला. माणुसकीला काळिमा फासणा-या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या गंभीर प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात आली. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दोषींवर नियमाने कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावलं गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की या पोलिसांचं निलंबन करावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे.हेदेखील वाचा- जळगाव: लज्जास्पद! महिला वसतीगृहातील तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास केली जबरदस्ती, पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप
जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं.
श्वेता महाले यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असे त्रोटक उत्तर दिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत हे योग्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. आई बहिणी सुरक्षित नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देऊ नका हे वाक्य रेकॉर्डवरून काढा अशी मागणी केली.
जळगाव मधील एका महिलांच्या वसतीगृहातील लज्जास्पद घटना समोर आली आहे. या वसतीगृहातील तरुणींना त्यांचे कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांसह वसतीगृहाबाहेर पुरुष यात सहभागी असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.