महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Elections 2019) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाजानदेश यात्रा (Mahajandesh Yatra) काढण्यात आली आहे. रविवारी 1 सप्टेंबर रोजी सोलापूर (Solapur) येथे महाजानदेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P. Nadda) यांची प्रमुख उपस्थिती असेल याविषयी यात्रा प्रमुख व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. याशिवाय जालना (Jalna) येथे 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेलाही शहा व नड्डा उपस्थित राहणार आहेत. (BJP Maha Janadesh Yatra: भाजप हाऊसफुल, आमची मेगाभरती नव्हे तर, लिमिटेड भरती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात पक्षांतराचे सत्र सुरु आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते आता भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. विधानसभा निवडणुकांआधी हा विरोधी पक्षांसाठी मोठा धक्का सिद्ध होऊ शकतो. तर दसुरीकडे, विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागांवर निवडणुका लढवणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत शिवसेना युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई यांनी माहिती देत सत्ता आल्यास अडीच वर्षासाठी दोन्ही पावसाचा मुख्यमंत्री असेल अशी शक्यता वर्तवली होती.