 
                                                                 कर्जबाजारीला वैतागून एका शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात पेटवून (Farmer Suicide) घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना वसमत तालुक्यातील पळसगाव येथे घडली. कर्जबाजारीला वैतागून संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. याप्रकरणी वसहत ग्रामीण पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सद्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून राज्यातील शेतकऱ्यांनाही याचा फटका लागल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरस वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बॅंकेकडून घेतलेले कर्ज परत करताना अडचणी येऊ लागले, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बालाजी संभाजी डाखोरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. बलाजी हे आपल्या मुलगा आणि सूनेसोबत राहत होते. मात्र, या अल्प भूधारक शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात आत्महत्या केली आहे. बालाजी डाखोरे यांनी इंडिया बॅंकेकडून 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज असल्यामुळे बालाजी हे नैराश्यात होते. याच कर्जबाजारीला वैतागून बालाजी यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्याचा शेतात स्वताला पेटवून घेतले. या घटनेत ते गंभीर भाजले असून रुग्णालयात जाण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचा मुलगा आणि सूनेने दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच बालाजी यांनी आत्महत्या केल्यामागचे खरे कारण शोधत आहेत. हे देखील वाचा- लॉक डाऊनचा अर्थ समजून घ्या आणि वेळीच घरी बसा अन्यथा प्रशासनाला कडक पावलं उचलावी लागतील; नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नागरिकांना तंबी
ठाकरे सरकारने गेल्या महिन्याच्या अर्थ संकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याची घोषणा केली होती. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला होता. बालाजी यांच्यावर केवळ 1 लाखाचे कर्ज असून त्यांनी आत्महत्या का केली होती, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
