Vulture | representative Image | Pixabay.com

नवी मुंबई मध्ये उरणच्या चिरनेर गावामध्ये एका शेतात अडकलेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत हिमालयीन ग्रिफॉन गिधाड सापडलं आहे. या गिधाडाच्या मदतीसाठी Resqink Association for Wildlife Welfare धावले. अंदाजे 7 किलो वजनाचा हा पक्षी अनेक दिवसांपासून उपाशी होता आणि त्याचा कळप पुढे निघून गेल्यानंतर तो पाणी न मिळाल्याने डिहायड्रेड झाला होता.

गुरूवारी दुपारपासून गावकऱ्यांना सोडलेल्या गिधाडाचे दुर्मिळ दर्शन सुरू झाले. "या भागांमध्ये गिधाडे कधीच दिसत नाहीत, आणि अचानक एक संकटात सापडलेल्या अवस्थेत गिधाड दिसल्याने स्थानिकही घाबरले," असे प्राणी कार्यकर्ते जयंत ठाकूर यांनी वनविभागाला माहिती देताना म्हणाले.

ताबडतोब गिधाडाची माहिती स्थानिक संस्था आणि वनविभागाला देण्यात आल्याने या पक्ष्याची सुटका करण्यात आली. Golden Jackal in Navi Mumbai: खारघर मध्ये झालं सोनेरी कोल्ह्याचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल .

मुंबईतील RAWW च्या केंद्रात गिधाडाला आणल्यानंतर जखमांची तपासणी करण्यासाठी एक्स रे काढण्याचे, त्याचे काही नमुने घेण्यात आले. "सुदैवाने, कोणतेही फ्रॅक्चर नाहीत, परंतु पक्षी गंभीर अवस्थेत आहे. प्राथमिक चिन्हे विषबाधा सूचित करतात, शक्यतो दूषित शव खाल्ल्याने हा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे , परंतु पुढील अहवालांवर निश्चित कारणं स्पष्ट होईल" असे सांगण्यात आले आहे.

गिधाडामध्ये आता त्याच्या बचावानंतर थोडी सुधारणा दिसून आली आहे. सुरुवातीला खारट ठिबकांवर ठेवले, आता ताकद परत मिळवण्यासाठी त्याला जबरदस्तीने मांस दिले जात आहे. पुढील उपचारांचा निर्णय घेण्यापूर्वी किमान आठवडा भर त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल असं सांगण्यात आले आहे.

जर गिधाडाची प्रकृती  स्थिर झाली  तर त्याच्या पुनर्वसनाच्या पुढील टप्प्यात त्याला मुरबाडला नेले जाईल. मुरबाडला RAWW कडे त्याला पुन्हा त्याच्या जगात सोडण्यासाठीची यंत्रणा आहे.