High Tide in Mumbai | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई शहरामध्ये आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरीही समुद्र किनारी भरतीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज (9 जुलै) दिवशी दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी 4.67 मीटरच्या लाटा उसळू शकतात. सकाळपासुन मुंबई मध्ये पाऊस नसला तरीही थोडं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान वेधशाळेच्या अंदाजानुसार देखील अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसू शकतात. मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज कमी आहे.

कुलाबा आणि सांताक्रुज मध्ये यंदाच्या पावसाने आज 1000 मिमीचा टप्पा ओलांडला(200 मिलीमीटरपेक्षा जास्त) असल्याची माहिती हवामान वेधशाळेकडून देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असली तरीही कोकणात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.

ANI Tweet

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा प्रवास आता उत्तरकडे अधिक होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहार प्रांतामध्ये तसेच ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस असेल. परिणामी मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 5-6 दिवस अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता ओसरली आहे. मध्य महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये अधून मधून जोरदार सरी बरसू शकतात. अंदाजे 11 जुलै पर्यंत महाराष्ट्राचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे असू शकते.