मुंबई महानगपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, आज, 6 जुलै रोजी पुन्हा एकदा समुद्रात मोठी भरती अपेक्षित आहे. आज दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी अरबी समुद्रात 4.67 उंच लाटा उसळण्याचा अंदाज बीएमसी तर्फे वर्तवण्यात आला आहे. मागील सलग तीन दिवस मुंबईत समुद्रात मोठी भरती (High Tide In Mumbai) होत आहे. आज सकाळपासून मुंबई सह उपनगरात सुद्धा पावसाचा जोर (Mumbai Rains) कमी झाला आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज मुंबईत अधून मधून जोरदार सारी बरसतील मात्र सलग दिवसभर पाऊस असा राहणार नाही. असे असले तरी वारीचा वेग समुद्रालगतच्या भागात अधिक असेल त्यामुळे मच्छिमारीसाठी समुद्रात जाणे टाळावे असे सूचित करण्यात आले आहे.
मुंबई सह ठाणे, रायगड, कोकण, तळकोकण या भागात सुद्धा मागील ३ दिवस जोरदार पाऊस झाला होता. मुंबईत तर गेल्या 24 तासात सांताक्रूझ येथे 116 मिमी, ठाणे 213 मिमी आणि कुलाबा येथे 12 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी काढल्यास शहरात निश्चितच 115.6 mm हुन अधिक पावसाची नोंद झाली आहे.
ANI ट्विट
Mumbai: High tide of 4.67 meters expected at 1:03 pm today as per Brihanmumbai Municipal Corporation. Visuals from Bandra Bandstand. pic.twitter.com/mXDvgrlKkE
— ANI (@ANI) July 6, 2020
दरम्यान, समुद्री भरतीच्या वेळी किनाऱ्यालगत राहणाऱ्या घरांना बराच धोका असतो. कालसुद्धा अनेक घरात पाणी शिरल्याचे दृश्य सोशल मीडिया वर पाहायला मिळत होते. सलग पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात सुद्धा पाणी साचले होते.