Indrani Mukerjee: शीना बोरा हत्या प्रकरणातील (Sheena Bora Murder Case) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukerjea) या काही दिवसांसाठी भारताबाहेर जाणार होत्या. त्याबाबतची सशर्त मुंबई परवानगी सत्र न्यायालयाने दिली होती. मात्र. त्यावर आता सीबीआयने हस्तक्षेप घेतला. परिणामी इंद्राणी मुखर्जी यांना भारताबाहेर जाण्याकरता दिलेल्या परवानगीला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला उच्च न्यायालयाने 29 जुलैपर्यंत स्थगिती दिली. (हेही वाचा:Sheena Bora Murder Case: शीना बोरा हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा गायब; हाडे व अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची माहिती )
मुंबई सत्र विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला पुढील तीन महिन्यांमध्ये 10 दिवसांसाठी एकदा युरोप (स्पेन आणि युनायटेड किंगडम) प्रवास करण्याची सशर्त परवानगी दिली होती. मात्र हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करत तो रद्द करण्याची मागणी करत सीबीआयने हायकोर्टात याचिका दाखल करत केली. 'इंद्राणीवर मुखर्जीवर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. एका गंभीर प्रकरणात खटला सुरू असून तिला परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ती पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सीबीआयनं हायकोर्टासमोर केला.' त्यावर 29 जुलैला न्यायमूर्ती चांडक यांच्यापुढे नियमित सुनावणी होणार आहे. (हेही वाचा: Indrani Mukherjee Documentary: "द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ," चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सीबीआयचा विरोधी अर्ज कोर्टाने फेटाळला)
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?
इंद्राणी मुखर्जी यांनी शीना बोरा (24) हिची एप्रिल 2012 साली हत्या केली होती. हे प्रकरण 2015 साली उघडकीस आले. त्यानंतर इंद्राजी मुखर्जी अनेक महिने ते तुरुंगात होती. मात्र, सध्या इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे. यात इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली.
इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले.तेथे शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती.