Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Pulwama Terror Attack: गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामा येथील देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्यात 44 जवांन शहीद झाले आहेत. तसेच जम्मू येथून निघालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. त्यानंतर आता मुंबईत ही हायअलर्ट जाहीर करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा समितीत दहशतवाद्यांचे अड्डे क्षेपणास्राद्वारे उडवणार असल्याचे ही सांगितले जात आहे.

पाकव्याप्त कश्मिरवर लवकरच कारवाई करत क्षेपणास्र हल्ला होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जवानांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम असलेल्या मोदींनी पुलवामा हल्ल्याबाबत दुख व्यक्त केले आहे. तसेच आज झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्वाची बैठकीत पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तर दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: सहा महिन्यांपूर्वी कराची येथे रचला हल्ल्याचा कट; दहशतवादी हाफिज सईद याने दिली होती धमकी)

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी जैश-ए-मोहम्मदने पाकिस्तानमध्ये रॅलीचे आयोजिन केले होते. ही रॅली गेल्या 5 फेब्रुवारीला पाकिस्तानची राजधानी कराची या शहर काढण्यात आली होती. भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafiz Muhammad Saeed) याने अफजल गुरु याच्या नावाने आत्मघातकी गट (Suicide Squad) तयार करण्यात येत असल्याची भाषा या रॅलीत भाषण करताना केली होती.