Mumbai Airport वरुन 18 कोटींचे Heroin जप्त; परदेशी महिलेला अटक
Represerntational Image (Photo credits: stevepb/Pixabay)

मुंबई (Mumbai) मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एअर इंटिलिजन्स युनिट (Air Intelligence Unit) यांनी झांबिया (Zambia) देशाच्या एका नागरिकाला 3.5 किलो हिरोईन (Heroin) बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या ड्रग्सची (Drugs) एकूण किंमत 18 कोटी रुपये इतकी आहे. या आरोपी महिलेचे वय 40 वर्ष असून तिचे नाव Queency Chilutya Sakeli असे आहे. NDPC अॅक्ट अंतर्गत या महिलेला अटक झाली असून सध्या ती कस्टडी मध्ये आहे.

झांबिया मधील अडीस आबाबा या एअरपोर्टवरुन ही महिला मुंबईकडे येण्यास निघाली होती. मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर या महिलेच्या सामानाची तपासणी करण्यात आली आणि त्यातून 3.6 किलोचे हिरोईन जप्त करण्यात आले. ड्रग तस्करी प्रकरणी मागील आठवड्याभरात AIU कडून 5 वेगवेगळ्या महिलांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Drugs Case: मुंबई मध्ये मागील वर्षभरात 300 कोटींचे ड्र्ग्स जप्त तर 300 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्स अटकेत; NCB ची माहिती)

ही आरोपी महिला हे ड्रग्स आपल्या दिल्लीमधील साथीदाराला पोहचवणार होती. त्यानंतर हे ड्रग्स युरोपीन देशांमध्ये निर्यात केले जाणार आहे, असा अंदाज अधिकाऱ्यांना आहे. तालिबाननी अफगाणिस्तानला काबिज केल्यानंतर युरोपीन देशांमध्ये ड्रग्स पोहचवण्यासाठी आरोपी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. बुधवारी AIU ने Annie Kuchete आणि Vaidya May या दोन आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींकडे रिपब्लिक ऑफ मलावी चा पासपोर्ट होता. हे आरोपी दोहामधून मुंबईत आले होते. या दोन्ही आरोपींकडून सुमारे 5 किलोग्रॅम हिरोईन जप्त करण्यात आले. या हिरोईनची किंमत 25 कोटी रुपये इतकी होती.