Maharashtra Monsoon 2020 Update: मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता- IMD
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबई, ठाणे येत्या 24 तासांत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून राज्याभरात वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर पुढील 24 तास ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर जुलै महिन्यात आणि ऑगसट्या पहिल्या आठवड्यात पावसाने मुंबई सह पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं. (मुंबई तलावक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने 21 ऑगस्टपासून 10% पाणीकपात; 85% जलसाठा उपलब्ध)

 K. S. Hosalikar Tweet:

राज्यात इतरत्र 20 ते 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान पुणे, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पाणी कपात 20% वरुन 10% वर करण्यात आली आहे.