Mumbai rains Update (Photo Credits: ANI/Twitter)

Mumbai Monsoon Update: मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. दरम्यान काल रात्रीपासून देखील मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे माहीम, अंधेरी भागांत वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी मुंबईच्या मध्य आणि शहरी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत काल सकाळी पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. मात्र संध्याकाळी हळूहळू पावसाने जोर धरला. काल (10 जून) रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने सखोल भागात पाणी साचले आणि वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली.हेदेखील वाचा- Mumbai Rains: मुंबईकरांसाठी Open Manhole ठरतायत जीवघेणे; पाहा व्हिडिओ

यात मुंबईच्या माहीम, अंधेरी भागात वॉटर लॉगिंगची समस्या उद्भवली. पावसाचा जोर आज कायम राहणार असून पुढील 2-3 तासांत अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच भांडूप, मुलूंड सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे.

पावसाच्या नोंदी, व पश्चिम दिशेचे वारे व इतर घटक मान्सूनचे आगमन होण्यासाठी पूरक आसल्यामुळे , काल 10 जुन ला संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून ने व्पापला गेला होता.