Raigad Rain : रायगड मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. किल्ले रायगडावर देखील जोरदार पाऊस झाला. त्याचाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात किल्ले रायगडावरील महादरवाजातून अक्षरश: धबधबा वाहत असल्यासारखा पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहून पर्यटक चांगलेच घाबरले. कुणी दगडी कडाचा, कुणी लोखंडी खांबाचा आधार घेतल्यामुळे थोडक्यात बचावले. (हेही वाचा:Mumbai Pune Train Cancelled: जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका; पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड,डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द )
रायगडावर पावसाचं रौद्ररुप पाहून सध्या गड पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. त्याशिवाय, कुणी अशा परिस्थीत गड चढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर शेकडो पर्यटक गडावर अडकल्याचे चित्र समोर आले. तेथे बचावकार्य राबवले जात आहे. पावसाच्या जोरदार सरींनी रायगडसह संपूर्ण राज्यात अनेक भागांत जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबई , ठाणे, नवी मुंबई, कल्णाय परिसरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून पाऊस पडत आहे.
व्हिडीओ पहा
#किल्लेरायगड #Raigad रायगड किल्ल्यावर काल (रविवारी ता.7) ढगफुटी सदृष्य पावसामुळे धबधब्यासारखे पाणी वाहत होते. यामुळे पर्यटक वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवस गड किल्ल्यांवर पर्यटनास बंदी घालावी अशी आमची मागणी आहे. @CMOMaharashtra pic.twitter.com/VluLtE4Xn0
— Sahyadri Mountaineering Organization, (Reg) Junnar (@SahyadriJunnar) July 8, 2024
रत्नागिरीत नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागांत गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर या भागातील नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून नदीकिनारीच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.