Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus In Maharashtra)  रुग्णसंख्या रोज नवनव्या रेकॉर्डसह वाढत आहे तर दुसरीकडे या रुग्णांंसाठी उपलब्ध कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडरच्या (Oxygen Cylinder) उपलब्धतेचा प्रश्न गंंभीर होत आहे आज याच प्रश्नावर राज्य सरकारतर्फे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांंच्या माहितीनुसार, साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80  % व उद्योगांसाठी 20 % या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020  पर्यंत लागू राहील.  धोका वाढला! महाराष्ट्रात दिवसभरात सर्वोच्च 23,350 संक्रमित रुग्णांची नोंद, 328 जणांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50  ते 60 % आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचाआता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडुन घेतली जात आहे अशी माहिती राजेश टोपे यांंनी दिली आहे. मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजेश टोपे ट्विट

दरम्यान, काल पुणे विभागात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरुन पालकमंत्री व पुण्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांंच्यासह बैठक पार पडली होती, यात पवारांंनी ऑक्सिजन संंदर्भात केंद्राकडुन सुद्धा राज्याला सहकार्य लाभावे असे सुचवले होते.