Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा (Health Department Recruitment 2021 Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळला. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. मात्र, शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा ही 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर या दिवशी होणार होती. राज्यातील 1 हजार 500 केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत घेण्यात येणार होती. दरम्यान, राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. परीक्षा केंद्रांची पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, तांत्रिक अडचणींचे कारण देत या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. हे देखील वाचा- Maharashtra Religious Places Reopen: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार

राजेश टोपे यांची फेसबूक पोस्ट-

महत्वाचे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा लवकर घेण्यात येणार आहे. तसेच या परिक्षेची नियोजित तारीख उमेदवाराना विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे.