Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाची (COVID-19 Pandemic) स्थिती हळूहळू आटोक्यात येत असून याचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. यात कोरोना रुग्णांना लवकरात लवकर बरे करणे हा एकच ध्यास डॉक्टर्स, नर्स आणि अन्य आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांचा आहे. मात्र त्यासोबत आता नॉन कोविड रुग्णसेवेकडेही (Non COVID Services) आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी जिल्हा आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत.

मुंबईत आज कोरोनाची परिस्थितीबाबत बोलत असताना राजेश टोपे यांनी आता नॉन कोविड रुग्णसेवेकडेही आरोग्य केंद्रांनी लक्ष केंद्रित करावे अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.हेदेखील वाचा- New Year 2021: नव वर्षाची पूर्वसंध्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची आज करडी नजर; नाईट कर्फ्यू ते फटाकेबंदी या नियमांचं भान ठेवत स्वागत करा नवावर्षाचं!

अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल (30 डिसेंबर) राज्यात कोरोना विषाणूच्या 3,537 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,913 रुग्णांना रुग्नालयामधून सोडण्यात आले आहे व 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 19,28,603 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 18,24,934 रुग्ण बरे झाले आहत व 49,463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 53,066 सक्रीय रुग्ण आहेत.