Harshvardhan Patil PC TWITTER

Harshvardhan Patil महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील अनेक नेत्यांचा दौरा सुरु झाला आहे. दुसरीकडे पक्षांतर सुरु आहे. ऐवढ्यात भाजपचे नेते हर्षवर्धन भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे. त्यांच्या या निर्णयानंचर भाजप पक्षाला धक्काच बसला आहे. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. (हेही वाचा-लाडक्या बहिणींच्या' भेटीसाठी 5 ऑक्टोबरला ठाण्यात; Mukhyamantri Ladki Bahin Yojana कार्यक्रमात पहिल्यांदाच होणार थेट सहभागी)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षातील नेते जयंत पाटील यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहले की, '' हर्षवर्धन पाटील यांच्या NCP (SP) मध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत ते 7 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे पक्षात प्रवेश करतील. "

ट्वीट 

हर्षवर्धन पाटील भाजप पक्ष सोडून शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. पक्ष प्रवेशाच्या चर्चेनंतर लगेच खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  शुक्रवारी हर्षवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा खुलासा केला. फडणवीस यांनी आपल्याला ‘दुसरा पर्याय’ देऊ केल्याचेही त्यांनी नमूद केले.