No Happy New Year 2019: दारुचे प्याले भराभर रिते करुन सरत्या वर्षाला निरोप (Good by 2018) देत नववर्षाचे स्वागत करणाऱ्या मद्यपी वाहन चालकांचा वर्षांरंभ दंडात्मक कारवाईने झाला आहे. दारुच्या नशेत वाहन हाकणाऱ्या तब्बल 455 वाहन चालकांवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने (Mumbai Police Transport Department) कारवाई केली. यात काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, काहींचे वाहन चालविण्याचा परवाना (Driving license) जप्त केला आहे. वाहनवेगाची मर्यादा भंग करणाऱ्या 1114 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी ही कारवाई ३१ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत केली.
वाहतूक पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाचे सेलिब्रेशन केल्यानंतर प्रवास करुन परतणाऱ्या मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी सालाबादप्रमाणे वाहतूक पोलिस यांदाही सज्ज होते. दारुच्या नशेत वाहन हाकणाऱ्या चालकांवर कायदेशीर करण्यात वाहतूक पोलिसांनी कोणतीही कुचराई दाखवली नाही. कायद्याचा हिसका दाखवत पोलिसांनी सुमारे ४५५ चालकांना पकडलं. हे चालक नशिल्या पदार्थांचे सेवन करुन गाडी हाकत होते. काही चालकांनी वाहनवेगाची मर्याता ओलांडली होती. अशा सुमारे 1114 चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. (हेही वाचा, आजपासून पुण्यात हेल्मेट सक्ती, पुणेकर सक्ती विरोधात 3 जानेवारीला विनाहेल्मेट रॅली काढणार)
नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त केला होता. ठिकठिकाणी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. 2018 ला निरोप देत 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी सुमारे 1533 वाहन चालकांना पकडलं होतं. त्यातील 76 जण दारुच्या नशेत असल्याचे आढळले. सर्वांची तपासणी करेपर्यंत चक्क दुसरा दिवस उजाडला. तपासणीदरम्यन सकाळी 6 वाजेपर्यंत 455 मद्यधुंद जालकांवर करावाईचा बडगा उगारण्यात आला.