Happy Holi 2019: होळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे. तर मुंबईत वरळी येथील होळी पाहण्याजोगी असते. या दिवशी मोठ्या जल्लोषात लोक होळीचा आनंद साजरा करताना दिसून येतात. तर मुंबईतील वरळी येथील बी.डी.डी चाळ येथील होळी पाहण्यासाठी लोक खुप गर्दी करतात. तसेच प्रत्येक वेळी या चाळीकडून विविध प्रकारच्या पद्धतींची होळी उभारण्यात येते.
वरळी येथील बी.डी.डी चाळ क्र. 78/79 मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांनी यंदाच्या होळीच्या निमित्ताने पुलवामा दहशतावदी हल्ल्यातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) ह्याची होळी उभारली आहे. तसेच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणाऱ्या या मंडळाची यंदाची होळी 20 मार्च रोजी रात्री ठिक 12 वाजता जाळ्यात येणार आहे.(हेही वाचा-Holika Dahan 2019: हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?)
तसेच बी.डी.डी चाळ क्रमांक 76/77 यांनी पबजी (PUBG) गेमची होळी उभारली आहे. सध्या देशभरातून पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच पबजी मुळे तरुणांचे जीव गेल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी पबजी गेमवर पूर्णपणे बंदी आणण्यात येईल का याबद्दल पालक प्रश्न उपस्थित करत आहेत.