Shirdi Sai Baba Temple: साईबाबा मंदिरातील काकड आरती भोंग्यावरच करा, शिर्डी येथील मुस्लिम समूदयाचे प्रशासनाला पत्र
Shirdi Sai Baba | ((Photo Credit: sai.org)

मशिदींवरील भोंगे (Hanuman Chalisa Loudspeaker Row) आणि त्याबाबत मनसेने (MNS) घेतलेली भूमका यावरुन राज्यभर वातावरण तापले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी पहाटेची अजाण भोंग्यांशिवाय पार पडल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला शिर्डी येथील साईबाबत मंदिरातही ( Shirdi Saibaba Temple) पहाटेची काकड आरती (Sai Baba - Kakad Aarti ) भोंगा वापरता झाली. त्यामुळे आता मंदिररांमधील आरत्याही भोंग्यांशिवाय होणार का? असा प्रश्न विचारला जा होता. दरम्यान, साईबाबांची काकड आरती भोंग्यावरुनच केली जावी, अशी विनंती शिर्डी येथील मुस्लिम समूहाने केली आहे. याबाबत तसे एक पत्र त्यांनी पोलीस आणि साईबाबा प्रशासनाला दिले आहे. हे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही धार्मिक स्थळ अथवा कार्यक्रमास सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच भोंगा म्हणजेच ध्वनीक्षेपक वापरण्यास मान्यता आहे. या ध्वनीक्षेपकांचे आवाजही विशिष्ट डेसीबलमध्येच असतील असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या नियमांचे पालन केल्याने शिर्डी साईबाबा मंदिरात पहाटे होणारी काकड आरती पाठिमागील अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच लाऊडस्पीकर न वापरता काकड आरती आणि शेजारती करण्यात आली. (हेही वाचा, Hanuman Chalisa Loudspeaker Row: तिरुपती बालाजीला गेलेले मनसे नेते वसंत मोरे नॉट रिचेबल, 'राज'आज्ञा मोडल्याची चर्चा)

शिर्डी साईबाबा देवस्तान ट्रस्टने पोलिसांकडे भोंगा वापरण्यासाठी रितसर अर्ज केला. अर्जाची सर्व छाननी करुन आणि नियम व अटींचे पालन करण्याचे बंधन घालून पोलिसांनी लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली. नियमानुसार आता या मंदिरात केवळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच भोंगा वापरता येणार आहे. साईबाबांची पहाटेची काकड आरती पहाटे 5 तर शेजारती रात्री 10.30 वाजता होते. त्यामुळे देन्ही आरतीच्या वेळी शिर्डीमध्ये भोंगा वापरता आला नाही. परिणामी साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली.