Gulab Cyclone: महाराष्ट्रात 'गुलाब'चा प्रभाव, आभाळातून कोसळधारा; चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, हवामान विभागाकडूनही अतिवृष्टीचा इशारा
Heavy Rain | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

'गुलाब' चक्रीवादळ (Gulab Cyclone) महाराष्ट्रात जोरदार प्रभाव दाखवताना दिसत आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra) कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी महापुरामुळे तर काही ठिकाणी विज कोसळल्याने, पावासात झाडे, घरे कोसळल्याने अपघाताच्या घटना घडल्याचे पुढे आहे. प्रामुख्याने कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या मराठवाडा आणि विदर्भात पावसाने काल (मंगळवारी, 28 सप्टेंबर) दमदार हजेरी लावली. याशिवाय मुंबई, ठाणे परिसराला झोडपले. आजही (बुधवार, 29 सप्टेंबर) ही स्थिती कायम असून अनेक ठिकाणी आभाळातून पाऊस जोरदार बरसत आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात आणि विदर्भात अतिवृष्टी झाल्याने अनुक्रमे दहा आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. तर नाशिक येथेही एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. नडीआरएफच्या पथकाने वेळीच मदत आणि बचाव कार्य केल्याने 560 पेक्षाही अधिक नागरिकांना सुखरुप ठिकाणी पोहोचविण्यात आले. मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी वाचवता आली मात्र पशूधन वाचविण्यास मर्यादा आल्या. रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा सलग पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यातून सुमारे 200 पेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली. काही दुकाने, घरांची मोठी पडझड झाली. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ पावसाने मोठे नुकसान केले. (हेही वाचा, ST Bus Swept Away in Yavatmal Video: यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस पूराच्या पाहण्यात वाहून गेली;)

यलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे

  • कोल्हापूर
  • सांगली
  • सातारा
  • सोलापूर

ट्विट

हवामान विभागाने पुढच्या 24 तासांसाठी मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या समुद्र किनारपट्टी भागात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आला आहे.