मुंबईच्या (Mumbai) वांद्रे (Bandra) येथे एका चार मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग शेजारच्या निवासी इमारतीवर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री अदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वांद्रे येथील दुर्घनाग्रस्त इमारचीच्या ठिकाणाला भेट दिली आहे. तसेच सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, या दुर्घटनेत मृत व्यक्तिच्या कुटुंबियांस 4 लाखांची मदत मिळणार आहे. तर, जखमी व्यक्तीस नियमानुसार अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वांद्र्याच्या रिजवी महाविद्यालयाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. ही इमारत गेल्या तीन दशकांपासून रिकामी होती. मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेक्सू ऑपरेशन सुरु केले होते. तसेच ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबई: कॅप्टन अमोल यादव यांच्या भारतीय बनावटीच्या Aircraft ला उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार-उद्योगमंत्री सुभाष देसाई
ट्वीट-
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @AUThackeray यांनी वांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणाला दिली भेट. चालू असलेल्या मदतकार्याचा घेतला आढावा. दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांस ४ लाखांची मदत,तर जखमी व्यक्तीस नियमानुसार अनुदान देण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती pic.twitter.com/KhzUiDcXRI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 18, 2020
मुंबई येथील चेंबूर परिसरात 13 ऑगस्टला एका इमारतीचा एक भाग कोसळला होता. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर, चार जण जखमी झाले होते. तसेच जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे मुंबईत 2 वेगवेगळ्या ठिकाणी इमारत कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, अनेकजण जखमी झाले होते.