प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

अंधार पडल्यामुळे मार्ग सापडत नसल्याने 20 ट्रेकर्स हरिश्चंद्रगडावर अडकून पडले होते. मात्र सकाळ होताच या ट्रेकर्सने गड उतरायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीसाठी इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाने प्रयत्न करायला सुरुवात केली. आज (सोमवारी) उजाडल्यानंतर ही बचाव मोहिम सुरु करण्यात आली.

हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा 500 मीटर्सचा सुळका उतरण्यास अडकलेल्या ट्रेकर्सने सुरुवात केली आहे. हा सुळका उतरल्यानंतर त्यांना आणखी एक 300 मीटरचा सुळका उतरावा लागणार आहे. त्यानंतर पुढे अंदाजे 3 तास पायी चालल्यानंतर हे ट्रेकर्स आपल्या बेस कँपपर्यंत पोहचतील. यासाठी सुमारे 6-7 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या ट्रेकर्सच्या मदतीसाठी इतर प्रोफेशनल ट्रेकर्स देखील रवाना झाले आहेत.

डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसह हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यात 5 महिला आणि 17 पुरुषांचा समावेश आहे. ट्रेकिंगदरम्यान हे सर्व कोकणकडापासून खाली 1000 फूट अंतरावर अडकले. अंधार पडल्याने त्यांना पुढील मार्ग सापडत नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती ठाणे ग्रामीण पोलिस आणि जुन्नर पोलिसांनी दिली होती.