. Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर बेलसीरिजसारख्या पॉर्न फिल्म (Porn Film) प्रसिद्ध करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. या शूटिंगच्या जागीच मुंबई पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे. सबस्क्रिप्शन बेसिसवर दर आठवड्याला लाईव्ह पॉर्न फिल्म सुरु असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली . त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या फिल्म्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचाही समावेश आहे. अशाप्रकारच्या पॉर्न कंटेण्टमधून हे लोक कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल अॅपच्या माध्यमातून पॉर्न फिल्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. लाखो सबस्क्रायबर्सना सो कॉल्ड ओरिजिनल पॉर्न कंटेण्ट विकून ही टोळी कोट्यवधी रुपये कमवत होती. दरमहा 199 रुपये सबस्क्रिप्शन घेऊन ते आपले चॅनेल चालवत होते. रीतसर कॅमेरा क्रू, अभिनेते, तंत्रज्ञ घेऊन या फिल्म्सचे शूटिंग सुरू ठेवली जाते. या शूटिंगच्या जागीच पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai: चेंबूरमध्ये विवाह सोहळ्यात 200 हून अधिक लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा; FIR दाखल

ज्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी छापा टाकला बोल्ड लव्ह स्टोरीचे शुटींग सुरु होते, असे मत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी व्यक्त केले आहे. परंतु, पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना या ठिकाणी स्क्रिप्ट, डायलॉगही सापडले आहेत. त्यानुसार लव्ह स्टोरीपेक्षा हा भलताच कंटेण्ट असल्याचे उघड झाले आहे. अशा पॉर्न कंटेण्टमधून हे लोक कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा महाराष्ट्र पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. यासह दोन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.