धक्कादायक! 2 वर्षाच्या सावत्र नातीला आजीने सहाव्या मजल्यावरुन फेकले, आवडत नाही म्हणून चिमुरडीची केली निर्घृण हत्या
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai: मालाडच्या (Malad) अप्पापाडा परिसरात खूपच धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. या परिसरात एका 50 वर्षीय आजीने आपल्या 2 वर्षाच्या सावत्र नातीला सहाव्या मजल्यावरुन फेकल्याची घटना घडली आहे. यात नातीचा जागीच मृत्यू झाला असून तिची आजी रुक्साना अन्सारी हिला अटक केली आहे. जिया असे या मृत मुलीचे नाव आहे. जिया रुक्साना आवडत नसल्याने तसेच ती आपल्या दुस-या नातवाशी सतत भांडत करत असल्याने तिला मारल्याचे रुक्सानाने सांगितले आहे.

वांद्रे येथे वास्तव्यास असलेले इजाज उबेदुल्ला अन्सारी यांचे कुटुंब काही दिवसांपूर्वी कुरार येथे राहण्यास आले होते. या ठिकाणी रुकसाना, तिचा पती, मुलगी, नातू यांच्यासह इजाज त्याची पत्नी आणि मुलगी जिया हे एकत्र राहत होते. शनिवारी पहाटे जिया इमारतीखाली पडलेली काही नागरिकांनी पाहिले. तिला उपचारासाठी त्वरित शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी जिया हिला मृत घोषित केले आणि उंचावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. हेही वाचा- जेवर: आईकडूनच ८ महिनेच्या मुलाची हत्या, धान्यात लपवले अर्भक

सुरुवातीला रुक्साना खरं सांगण्यास टाळाटाळ करत होती. मात्र पोलिसांना तसेच घरच्यांना तिच्यावर संशय होता. हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिला. जिया ही रुक्सानाची सावत्र नात होती. खेळण्यावरून तिचे आणि रुक्सानाच्या नातवाचे भांडण व्हायचे. त्यावेळी रुक्साना नेहमी आपल्या नातवाची बाजू घ्यायची आणि जियाला मारहाण करायची. यामुळे जियाची आई काही दिवसांपूर्वी माहेरीही गेली होती.

रात्री घरातले झोपलेले असतानाची संधी साधून रुक्साना ने जियाला आपल्या खिडकीतून खाली फेकले. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.