Gram Panchayat Election 2021: राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार असल्याने जोरदार तयारी सुरु झाली आहे. याच दरम्यान काही ग्रामपंचातींकडून सरपंचाच्या पदाच्या लिलावाच्या बातम्या समोर आल्याने नवी चर्चा सुरु झाली आहे. यामुळेच आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सरपंच पदाच्या लिलावाच्या तक्रारी सुद्धा आयोगाकडे आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी माहिती दिली आहे.(Gram Panchayat Election 2021: 70 वर्षांच्या आजीबाई ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध; चिपळूण तालुक्यात 83 ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 224 उमेदवारी अर्ज)
सरपंच पदासाठी लिलाव केला जात असून त्यासाठी मोठ्या रक्कमेची बोली लावली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. त्यामुळे ही एक गंभीर बाब असून त्या बद्दल चौकशी करुन अहवाल सादर करावा असे आदेश दिले गेले आहेत.(Gram Panchayat Election 2021: सरपंच पद लिलाव पद्धतीला अण्णा हजारे यांचा विरोध; ग्रामपंचायत निवडणुकीबाबत केले महत्त्वाचे विधान)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी काही ठिकाणी उमेदावारी अर्ज मागे घेतल्यास आणि एकच उमेदवार शिल्लक राहिल्यास त्याचा बिनविरोध विजय घोषित केला जातो. त्याचसोबत एखाद्या उमेदवाराला त्याचा अर्ज मागे घेण्यासाठी कोणीही दबाब टाकल्याची शक्यता ही नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळेच अशा पद्धतीचे प्रकार होऊ नये यासाठीच तत्काळ त्या संदर्भात सविस्तर अहवाल पाठवावे. त्याचसोबत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच संबंधित उमेदवाराला बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून घोषित केले जावे असे आदेश आयोगाने 23 डिसेंबर 2004 मध्येच दिले आहेत.