Gram Panchayat Elections 2021: कोकणातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं चित्र पाहून आशिष शेलार यांचं ट्वीट; विरोधकांना लगावला 'हा' टोला
Ashish Shelar (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा (Gram Panchayat Elections) आता बोलबाला सुरू झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी त्याचे निकाल हाती येत आहे. कोकणामध्ये भाजपाचे (BJP) एकूण 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्यावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आज (6 जानेवारी) भाजपाच्या आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करत त्यांचे 182 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आनंद व्यक्त करत विरोधकांना टोला देखील हाणला आहे. BMC Elections 2022: ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद.

आशिष शेलार यांच्या ट्वीटनुसार, सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजूनही काही जागांचे निकाल हाती येण्याचे बाकी आहे. त्यामुळे कोकण म्हणजे आम्हीच अशा अहंकारी पक्षाचे वस्त्रहरण सुरू झाले असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव टाळत त्यांना टोला लगावला आहे. आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो! असं म्हणतं त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. Maharashtra Gram Panchayat Election 2021: आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे 30-35 वर्षांत पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक; पोपटराव पवार रिंगणात.

आशिष शेलार ट्वीट

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील जागांवर महाविकास आघाडीने एकी दाखवत भाजपाला नामोहरण केले होते. त्यावेळेस काही ठिकाणी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र आल्याने पुणे आणि नागपूर सारखे भाजपाचे वर्चस्व असलेले मतदारसंघात भाजपाच्या हातून निसटले होते. तेव्हा आगामी निवडणूकांमध्येही महाविकास आघाडीमधील पक्षांची एकमेकांना भाजपा विरूद्ध साथ असेल अशी भूमिका होती. त्यामुळे विजयाबाबत विश्वास दुणावलेल्या पक्षांना आज आशिष शेलारांनी टोला लगावला आहे.