Election | (Representational Image)

महाराष्ट्रामध्ये काल (5 नोव्हेंबर) पार पडलेल्या 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी (Gram Panchayat Election Result) आणि 130 सरपंच (Sarpanch) पदाच्या रिक्त जागांसाठी मतदान पार पडले आहे. या निवडणूकांचा आज निकाल केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार  राज्यात सुमारे 74% मतदान पार पडले  राज्यात नक्षलग्रस्त भाग वगळता या सर्व ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होईल तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांमध्ये 7 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

सकाळी 10 च्या सुमारास मतदानाला सुरूवात होणार आहे. यामध्ये काही ठिकाणी बिनविरोध ग्राम पंचायती निवडणूका पार पडलेल्या असल्याने तेथील निकाल स्पष्ट झालेले आहेत. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. बदलत्या राजकीय गणितांचा ग्रामीण स्तरावरील निवडणूकीत किती परिणाम दिसतोय हे या निवडणूकीमधून दिसणार आहे. या निवडणूकीमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली असल्याने त्यादृष्टीने देखील आजचे निकाल महत्त्वाचे आहेत.

निवडणूकांचे लाईव्ह निकाल

ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानामध्ये काल काही ठिकाणी तुरळक भागात ताण-तणाव होता. अन्यथा इतरत्र शांततेमध्ये मतदान पार पडले आहे. आज मतदान मोजणी केंद्रांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.