Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सचिन अंदुरे सह दोघांना अटक, आज कोल्हापूर कोर्टात होणार सुनावणी
Gomred Govind Pansare | (File Photo)

कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्येप्रकरणी तपास करत असणाऱ्या  महाराष्ट्र पोलिसांच्या  (Maharashtra Police) विशेष शोध पथकाने ( Special Investigation Team) गणेश मिस्किन (Ganesh Miskin), अमित बद्दी (Amit Baddi) , सचिन अंदुरे (Sachin Andure)  या तिघांना ताब्यात घेतले असून आज या तिघांना कोल्हापूर (Kolhapur) येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजत आहे.

(हे ही वाचा -Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकरांच्या हत्येवेळी वापरण्यात आलेल्या हत्या-यांचा CBI घेणार समुद्रात शोध, पावसाचा जोर कमी होताच शोधमोहिम होणार सुरु)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनाही अशाच साधर्म्याने मारण्यात आले होते. पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात विविध स्तरावरून उद्रेक पाहायला मिळाला होता. दरम्यान या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपी शार्प शुटर सचिन अंदुरे याला महाराष्ट्र्र पोलिसांच्या विशेष शोध पथकाने 26 ऑगस्ट 2019 रोजी अटक केले होते. त्यानंतर अनुक्रमे गणेश मिस्कीन व अमित बद्दी यांना मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिन्ही आरोपीना कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ANI ट्विट

दरम्यान , ज्येष्ठ विचारवंत पानसरे यांना 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे भर रस्त्यात गोळी मारण्यात आली होती, यानंतर त्यांना ताबडतोब हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचाराजाच्या दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यन्त या प्रकरणी तब्बल 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.