Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकरांच्या हत्येवेळी वापरण्यात आलेल्या हत्या-यांचा CBI घेणार समुद्रात शोध, पावसाचा जोर कमी होताच शोधमोहिम होणार सुरु

CBI ची टीमने हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे शोधणे सुरु केले आहे. त्यासाठी ते दाभोळकरांना ज्या पुलावर मारण्यात आले तेथील समुद्रात ही हत्यारे शोधणार आहेत.

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकरांच्या हत्येवेळी वापरण्यात आलेल्या हत्या-यांचा CBI घेणार समुद्रात शोध, पावसाचा जोर कमी होताच शोधमोहिम होणार सुरु
डॉ.नरेंद्र दाभोळकर (फोटो सौजन्य- ट्विटर)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर(Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला 6 वर्षे उलटून गेले तरीही अजून छडा लागला नाही. या हत्येचा तपास CBI ची टीम करत असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यात शरद कळसकर यांनी आपला गुन्हा केंद्रीय गुन्हा अन्वेषण खात्यासमोर कबूल केला. त्यामुळे CBI ची टीमने हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे शोधणे सुरु केले आहे. त्यासाठी ते दाभोलकरांना ज्या पुलावर मारण्यात आले तेथील समुद्रात ही हत्यारे शोधणार आहेत.

मात्र सध्या समुद्राला भरती असल्यामुळे आणि पावसाचा जोर जास्त असल्यामुळे समुद्रात ही हत्यारे शोधणे शक्य नाही. त्यामुळे पावसाचा जोर कमी होताच या हत्यारांचा छडा लावला अशी माहिती CBI ने पुणे कोर्टाला दिली आहे.

ANI चे ट्विट:

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात मी अ‍ॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले. फेब्रुवारी 2019 मध्ये 'सीबीआय'कडून न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.

Narendra Dabholkar Murder case: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची संशयित आरोपी शरद कळसकर याची कबुली

20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात सकाळच्या वेळेस दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे ही दोन नावे समोर आली. या दोघांनी मिळून हत्येसंर्भातील पुरावे, हत्यारे नष्ट करण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2019 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).