देशभरात घडणाऱ्या बलात्काराच्या घटना (Rape Cases) पाहता अनेकांकडून कायदा आणि न्यायव्यवस्थेला दूषणं लावली जात आहेत, मात्र हे बलात्काराचे मूळ उकरून फेकून देण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोकांचे शिक्षण देणे महत्वाचे आहे अशी भूमिका महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिली आहे. नागपुर विद्यापीठात (Nagpur University) अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. आपल्या संस्कृतीत एक काळ असा होता ज्यात कन्येची पूजा केली जात होती, मात्र आता याच मुलींवर दर दिवशी अत्याचार घडत आहेत, संस्कृतीचा पडलेला विसर हे या दुष्कृत्यामागील खरे कारण आहे. हे रोखण्यासाठी संस्कृत श्लोक शिक्षण प्रबोधन करणारे ठरेल अशा आशयाचे कोश्यारी यांनी भाषण केले.
नागपूर विद्यापीठात जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात कोश्यारी यांनी भाषण देताना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा वापर आणि गैरवापर, सत्ता आणि पैसा याबाबत देखील विशेष टिपण्णी केली . हॉलिवूड गायिका लेडी गागा हिने 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' संस्कृत श्लोक ट्वीट केल्याने युजर्स बुचकळ्यात, काय आहे नेमका अर्थ?
यापूर्वी अनेकदा भाजप नेत्यांकडून सुद्धा संस्कृत भाषेच्या वैज्ञानिक आणि सामाजिक उपयोगांबाबत भाष्य करण्यात आले होते. अगदी अलीकडेच लोकसभेत भाषण देत असताना खासदार गणेश सिंग यांनी दररोज संस्कृत बोलण्याने नर्व्हस सिस्टीम मजबूत होते तसेच मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते असे मत मांडले होते तर केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुद्धा आयआयटी पदवीप्रदान कार्यक्रमात संस्कृत ही सर्वात जुनी वैज्ञानिक भाषा असून भविष्यात चालते बोलते संगणक येणार असल्यास त्यात संस्कृत चा मोठा वाटा असेल असा विश्वास दर्शवला होता.