महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) म्हणजेच एमएसआरटीसी (MSRTC) बद्दल दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यपैकी पहिला निर्णय म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यााचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही निर्णयांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) राज्य सरकारच्या निर्णयावरुन आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती पुरेशी नाही. आम्ही जेवढी मागणी केली आहे तेवढी मदत राज्य सरकारने एसटीला करावी. अन्यथा आम्हाला सरकार विरोधात पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरु करावा लागेल, असा इशाराच बरगे यांनी दिला आहे. (हेही वाचा, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या MSRTC कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार; CM Eknath Shinde यांचे निर्देश)
श्रीरंग बरगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आरोप केले की, राज्य एसटी महामंडळास कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 360 कोटी रुपयांची आवश्यकता असते. परंतू, राज्य सरकारने आतापर्यंत केवळ 600 कोटी रुपयेच दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्यास अडचणी येत आहेत. दुसऱ्या बाजूला कोर्टात त्रिसदस्यीय समितीनं दिलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांच्या चार वर्षाच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करणयात आली आहे. मात्र, असे असले तरी, आतापासूनच अनियमितता सुरु झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे.असे बरगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर हल्ला झालेल्या क्रमचाऱ्यांना एसटी महामंडळाने बडतर्फ केले होते. बडतर्फ कर्मचाऱ्यांची ही संख्या 118 इतकी होती. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. तर सदावर्ते यांनी या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.