Coronavirus: जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी 200 खाटांसह सज्ज

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून आला नाही. यामुळे राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. यातच खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव (Jalgoan) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Government Medical College and Hospital) कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी 200 खाटांसह सज्ज झाले आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 37 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची समजत आहे. कोरोना विषाणू हा भारतासह 170 हून अधिक देशात धुमाकूळ घालत आहे. तसेच कोरोना विषाणू विरोधात प्रत्येक देश लढा देत आहेत. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी औषध तयार झाले नसल्याचे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, बँक खाते क्रमांक, पोचपावती, पद्धत

ट्वीट-

भारतात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढू लागल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत 49 हजार 391 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 183 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण 15 हजार 525 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात 617 लोकांचा मृत्यू झाली आहे. तर, 2 हजार 819 जणांनी कोरोनावर मात केली आहे.