Credit -File Photo

Chatrapati Sambhajinagar UPSC Exam: देशभरात रविवारी यूपीएससीची प्रिलिम परीक्षा (UPSC Exam)पार पडली. देशासह राज्यात परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थी धडपड करत असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 विद्यार्थी गुगल मेपमुळे परिक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचल्याचे समोर आले आहे. परिणामी त्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गुगल मॅप(Google Map)मध्ये त्यांना चुकीचा पत्ता दाखवण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. परिक्षेसाठी शहरातून तसेच दूरच्या गावातून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी संभाजीनगरात आले होते. मात्र गुगल मॅपमध्ये चुकीचा पत्ता दाखवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. (हेही वाचा:UPSC Prelims 2024 Postponed: लोकसभा निवडणूकांमुळे यूपीएससी कडून प्रिलिम परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहा नवी तारीख )

गुगल मॅपद्वारे विद्यार्थी केंद्रावर पोहोचल्यावर 'हे केंद्र चुकीचे आहे', असे कळले. त्यानंतर विद्यार्थी घाईघाईने दुसऱ्या केंद्रावर पोहोचले, मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. वेळेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. सुमारे ५० विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे.