Aaditya Thackeray (Photo Credits: Instagram)

देशात कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रात (Coroanvirus In Maharashtra) आहे, महाराष्ट्रात मुंबई (Mumbai)  शहरात सद्य घडीला चीन (China) च्या वुहान (Wuhan) शहरापेक्षाही अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत धारावी (Dharavi) सारखे भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरले आहेत. मात्र या सर्व चिंतेत एक दिलासादायक आकडेवारी सध्या समोर येत आहे. महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट हा जवळपास 24.5 दिवसांवर पोहचला आहे, विशेषतः धारावी मध्ये तर कोरोनाचा डबलिंग रेट 42 दिवस इतका अधिक झाला आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूंचा दर हा सुद्धा आता कमी होऊन अवघ्या 3% वर पोहचला आहे तर कोरोनावर मात करून डिस्चार्ज मिळवणाऱ्यांचा आकडा हा 44 % इतका आहे.कोरोना व्हायरस रुग्णांचा डबलिंग रेट राष्ट्रीय स्तरावर 16 दिवस इतका आहे तर मृत्यूंचा टक्का हा मुंबई इतकाच आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत (Coronavirus In Mumbai) आढळुन आले आहेत, लेटेस्ट माहितीनुसार, मुंबईत 24 तासात कोरोनाच्या नव्या 1015 रुग्णांची भर पडली असून तर 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोविड 19 रुग्णांचा आकडा 50,878 वर पोहचला आहे. कोरोनाव्हायरस बाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आदित्य ठाकरे ट्विट

महाराष्ट्रात राज्यात कोरोनाचे 90,787 रुग्ण रुग्ण आढळुन आले आहेत. काल, 9 जुन रोजी राज्यात 2259 कोरोना बाधीत रुग्णांची व 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, काल नवीन 1663 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत एकूण 42,638 रुग्ण बरे झाले आहेत.तर आजपर्यंत राज्यात एकुण 3289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दरम्यान देशात कोरोनाबाधितांचा आकडा 276583 वर पोहचला आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 133632 इतकी आहे तर 135206 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुर्देवाने आत्तापर्यंत 7745 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.