Coronavirus | Photo Credits: Pixabay.com

Coronavirus Update:  महाराष्ट्राच्या कोरोना रुग्णांच्या संख्येने आता चीनला (China) सुद्धा मागे टाकले आहे. लेटेस्ट अपडेटनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 90,787 रुग्ण रुग्ण आढळुन आले आहेत. काल, 9 जुन रोजी राज्यात 2259 कोरोना बाधीत रुग्णांची व 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे, काल नवीन 1663 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत एकूण 42,638 रुग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे तितकीच दुर्दैवी बाब म्हणजे,आजपर्यंत राज्यात एकुण 3289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत (Coronavirus In Mumbai) आढळुन आले आहेत,कालच्या माहितीनुसार, मुंबईत 24 तासात कोरोनाच्या नव्या 1015 रुग्णांची भर पडली असून तर 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोविड 19 रुग्णांचा आकडा 50,878 वर पोहचला आहे. मुंबई पाठोपाठ पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक (Nashik) ,औरंगाबाद (Aurangabad) येथे सुद्धा कोरोनाचे क्लस्टर आढळुन आले आहेत.राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे खालील तक्ता पाहुन जाणुन घ्या.

महाराष्ट्र सरकार तर्फे राज्यातील जिल्ह्यांंचे रेड,ग़्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये करण्यात आलेले विभाजन मॅप स्वरुपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (9 जुन रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंंबई 51100 1760 22943
ठाणे 14063 355 5218
पुणे 10073 429 5903
औरंंगाबाद 2085 110 1271
नाशिक 1660 95 1094
पालघर 1636 43 608
रायगड 1500 58 926
सोलापुर 1468 112 627
जळगाव 1149 115 516
अकोला 848 38 447
नागपुर 788 12 478
कोल्हापुर 670 8 430
सातारा 658 27 359
रत्नागिरी  378 14 187
अमरावती 303 19 200
धुळे 290 25 129
हिंगोली 214 0 168
अहमदनगर 210 9 121
जालना 209 5 131
सांगली 180 4 95
नांदेड 171 8 113
यवतमाळ 164 2 116
लातुर 139 4 112
सिंधुदुर्ग 130 0 31
उस्मानाबाद  125 3 74
बुलडाणा 97 3 54
परभणी 78 3 50
गोंंदिया 68 0 67
बीड 63 1 46
गडचिरोली 45 0 34
भंंडारा 42 0 24
चंद्रपुर 42 0 26
नंदुरबार 40 4 28
वाशिम 12 2 6
वर्धा 11 1 7
अन्य जिल्हे 78 20 0
एकुण 90787 3289 42639

दरम्यान, आजपर्यंत राज्यात तब्बल 5 लाख 77हजार 811जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी 90 हजार 787 नमुने पॉझिटिव्ह (15.71 टक्के) आले आहेत. यापैकी सुद्धा सद्य घडीला केवळ 44849 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत,त्यामुळे परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे असे म्हणता येईल.