पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. आता पुणेकर संभाजी पुलावरूनही (Sambhaji Bridge) दुचाकी (Two Wheeler) घेऊन जाऊ शकतात. गेले 15 वर्षे संभाजी पुलावरून दिवसा दुचाकी घेऊन जाण्यास मनाई केली गेली होती. फक्त चारचाकी गाड्या आणि रिक्षाच संभाजी पुलावरून जाऊ शकत होत्या. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे. लकडी पुलाला समांतर असणारे पूना हॉस्पिटजवळील यशवंतराव चव्हाण पूल आणि झेड ब्रिज बांधून झाल्यावरही लोक संभाजी पुलाचा वापर करत होते. या कारणाने वाहतूक कोंडी वाढत होती म्हणून संभाजी पुलावरून दुचाकीसाठी मनाई करण्यात आली होती.
शहरातील वाहतूक कोंडी, परिणाम, कारणे लक्षात घेता गेले आठ दिवसांपासून संभाजी पुलावरून दुचाकी गाड्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. नागरिक या पुलाचा वापर करू शकतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे. यंदाच्या पावसात पुण्यात बरीच वाहतूक कोंडी झाली होती. अशात मेट्रोचे कामही चालू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास अजूनच वाढला होता.
डेक्कनवरून टिळक रोड, स्वारगेट असह ठिकाणी जाण्यासाठी पूना हॉस्पिटलजवळील ब्रिजचा वापर केला जात होता. मात्र तिथेही वाहतूक कोंडी होत होती. असह सर्व गोष्टींचा विचार करून संभाजी म्हणजेच भिडे पुलावरून दुचाकीसाठी परवानगी दिली गेली आहे.