Metro (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Mumbai Metro Extended Train Services During Navratri: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवा (Mumbai Metro Service) विस्तारित करण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) चे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी याबाबत घोषणा करताना सागितले की, सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन सेवा वाढविण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरापर्यंत धावणार मेट्रो -

नवरात्रीत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान अतिरिक्त मेट्रो सेवा चालवल्या जातील. या काळात 15 मिनिटांच्या अंतराने दररोज 12 अतिरिक्त ट्रिप चालवल्या जाणार आहेत. (हेही वाचा -Mumbai Metro Aqua Line 3: अखेर प्रतिक्षा संपली! मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो ४ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता)

डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले की, नवरात्र हा एक असा सण आहे, जो लोकांना एकत्र आणतो. त्यामुळे मुंबई मेट्रो सर्व भाविक आणि नागरिकांसाठी कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे. तथापी, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि नवरात्रोत्सवादरम्यान ट्रेनच्या वेळा वाढवण्याचा आमचा निर्णय प्रवाशांचा अनुभव आणखी समृद्ध करील. (हेही वाचा - Mumbai Metro 3: मुंबईकरांना दिलासा! सप्टेंबर महिन्यात करता येणार पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गावरून प्रवास; सुरु होप्णार SEEPZ-BKC विभाग)

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या प्रवाशांसाठी उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विस्तारित वेळा आणि अतिरिक्त सेवांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक लवचिक आणि सुलभ करेल, असंही रुबल अग्रवाल यांनी नमूद केले.