मुंबईवरुन बदलापुरला जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईवरून कल्याण-डोंबिवली आणि बदलापूरला पोहोचवणाऱ्या ऐरोली - काटई महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वाहनधारकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऐरोली-काटई महामार्गाच्या पारसिक हिल डोंगररांगातील बोगद्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा महामार्ग हा पुढील वर्षीच्या मे महिन्यात ऐरोली-काटई रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याच्या शक्यता आहे. (हेही वाचा - Pune Accident: फिरायला जाताना मध्यरात्री रस्त्यात भीषण अपघात, मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकच फोन; अन्...)
शिवसेना खासदार राजन विचारे यांच्याकडून ऐरोली - काटई महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास कल्याण-डोंबिवली, बदलापूर तसेच नवी मुंबईकरांना मोठा लाभ होणार आहे. या महामार्गामुळे दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या महामार्गाचे 12.30 किमी लांबीच्या या रस्त्याचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. ऐरोली-काटई नाका हा एमएमआरडीमार्फत राबविण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकल्प राबविताना काही ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने नियंत्रण कक्षाचीही स्थापना केली आहे. या प्रकल्पादरम्यान लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियंत्रण कक्ष मदत करणार आहे.