मुंबईकरांसाठी खुशखबर! आधी बसचे तिकिट दर कमी आणि आता 400 एसी बस ची भर
परिवहन सेवा (फोटो सौजन्य- फेसबुक)

सध्या सरकार जनतेवर खूपच मेहरबान झालय. आधी बसचे तिकिट (Bus Ticket) दर कमी करुन जनतेला सुखद धक्का दिला. तो धक्का पचतो ना पचतो तोच आता बेस्टच्या ताफ्यात 400 नव्या एसी बसची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आनंद आता अगदी गगनात मावेनासा झाला आहे. आता बेस्ट चे किमान भाडे 5 रुपये झाले असून एसी बसचे भाडे 6 रुपये होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा किमान बसचा प्रवास तरी खूपच सुखकर होणार आहे.

मुंबई बेस्ट आपल्या ताफ्यात एसी बसेसची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी 400 मिनी एसी बसेसच्या खरेदी प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या 100 ते 200 एसी बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा बेस्ट प्रवास स्वस्त होईल. तसेच ह्या एसी बसमुळे मुंबईकराचा बेस्ट प्रवास खूप आल्हाददायक होईल असच म्हणावं लागेल.

वातानुकूलित बसचे नवे तिकिट दर (AC Bus ):

5 किमी- 6 रुपये

10 किमी- 13 रुपये

15 किमी- 19 रुपये

तर दैनंदिन पासाचे दर 60 रुपये इतके आकारले जाणार आहे.

बेस्ट प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! बस तिकिटांचे दर झाले कमी, वातानुकूलित बसचे कमीत कमी भाडे झाले 6 रुपये

बेस्टचे दर कमी व्हावेत अशी मागणी प्रवाशी कित्येक वर्षांपासून करत होते. मात्र बेस्ट प्रशासनाला ते शक्य नव्हते. मात्र बेस्ट ने आता खासगी करणाचा निर्णय घेतल्याने बेस्टच्या ताफ्यात अजून 7000 बसेस सामील होणार असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे.