बेस्ट प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! बस तिकिटांचे दर झाले कमी, वातानुकूलित बसचे कमीत कमी भाडे झाले 6 रुपये
BEST Bus (Photo Credits: PTI)

डबघाईला आलेल्या आणि आर्थिक नुकसानाच्या जंजाळात अडकलेल्या बेस्ट सेवेचे (Best) उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या नव्या तिकिट दरानुसार, आता 5 किमी साठी किमान भाडे 5 रुपये ठेवण्यात आले आहे. सध्या बेस्टचे 2 किमी अंतरासाठी किमान भाडे 8 रुपये आहे. त्याचबरोबर वातानुकूलित बस (AC Bus) साठी किमान भाडे 6 रुपये इतके आकारले जाणार आहे.

ह्या नवीन दरामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईत प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरेल.

काय आहेत नवीन दर:

विना वातानुकूलित बेस्ट तिकिट दर (Non AC Bus):

  • 5 किमी- 5 रुपये
  • 10 किमी- 10 रुपये
  • 15 किमी- 15 रुपये

    तर दैनंदिन पासाचे दर 50 रुपये इतके आकारले जाणार आहे.

वातानुकूलित बसचे तिकिट दर (AC Bus ):

बेस्टचे दर कमी व्हावेत अशी मागणी प्रवाशी कित्येक वर्षांपासून करत होते. मात्र बेस्ट प्रशासनाला ते शक्य नव्हते. मात्र बेस्ट ने आता खासगी करणाचा निर्णय घेतल्याने बेस्टच्या ताफ्यात अजून 7000 बसेस सामील होणार असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे.