सोने (Gold) या आंतरराष्ट्रीय पातळीवरही मैल्यवान समजल्या जाणाऱ्या धातूच्या (Precious Metals) किमतीत आणि भारतीय चलन रुपयाच्या घसरणीत काहीशी सुधारणा होत आहे. प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,090 इतकी पाहायला मिळाली. पाठीमागच्या ट्रेडमध्ये मौल्यवान धातूची हिच किंमत प्रति 10 ग्रॅम 47,090 रुपयांवर स्थिरावली होती. गुड रिटर्न्स या संकेतस्थळावर सोने, चांदी दरांबाबत (Gold Silver Rate) माहिती दिली जाते. या माहितीनुसार चांदी प्रति किलो 62,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. अर्थात हे सर्व दर कोणत्याही कराशिवाय असलेले मूळ दर आहेत. मात्र, प्रदेशानुसार लागणारे विविध करांचा अंतर्भाव झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे दर वेगवेगळे असू शकतात.
महाराष्ट्रीती प्रमुख शहरांतील सोने दर (सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार)
मुंबई-
22 कॅरेट: 47,90 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 49,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे-
22 कॅरेट:46,450 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 48,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर-
22 कॅरेट:47,090 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 49,090 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.