Gold- Silver Price Today : मुंबई, पुणे, नागपूर शहरांतील सोने-चांदी दर घ्या जाणून
Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने-चांदी (Gold- Silver Price Today) म्हटले की सर्वांनाच उत्सुकता असते ती त्याच्या किमतीची. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू अशी ओळख असलेल्या सोन्याच्या दराची मध्यंतरी काहीशी घसरण झाली होती. मात्र, हा दर पुन्हा सावरताना दिसतो आहे. बावीस कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 48,010 रुपये किमतीला विकले जात आहे. तर, हेच 22 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम सोने आगोदरच्या ट्रेडमध्ये बाजार बंद झाला तेव्हा 47,800 रुपयांवर विकले जात होते. गुड रिटर्न्स ही बेवसाईट जगभरातील मौल्यवान धातूंसंदर्भात माहिती देते. या बेवसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चांदीर 66,800 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. अर्थात इथे दिलेले दर हे पूर्णपणे मूळ स्वरुपातील असतात. त्यात प्रदेशानुरुप लागणारा जीएसटी आणि इतर कर याचा अंतर्भाव होऊन त्यात बदल होतो.

तुमच्या शहरातील दर

मुंबई

22 कॅरेट सोने- 48,010 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने- 52,380 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट सोने- 48,110 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने- 52,480 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट सोने- 48,110 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने- 52,480 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- प्रती 10 ग्रॅम चांदीचा दर 668 रुपये दराने विक्री होत आहे.

वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.