गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पहायाला मिळत आहे. तसेच सध्या देशभरात नवरात्रीचा सण सुरु असल्याने येणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिक सोने खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी हजार रुपयांपेक्षा अधिक वाढलेले दिसून आले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याच्या सणापर्यंत सोन्याचे दर 40 हजाराच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सुद्धा सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालेले दिसून येत आहेत सूवर्ण आभूषण विक्रेत्यांनी सांगितले की, सोन्याचे दर गगनाला भिडू लागल्याने लोक सोने खरेदीपेक्षा सोने रिसाइक्लिंग करण्यावर भर देत आहेत. ऑल इंडियन जेम्स एंड ज्वेलरी फेडरेशन चेअरमन बछराज बामलवा यांनी सांगितले की, दरवाढीमुळे लोक नव्याने सोने खरेदी करण्यापेक्षा जुन्या सोन्यातच काही फेरबदल करत दागिने घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.. तर आज सोन्याच्या दरात 1000-1200 रुपयांपर्यंत वाढ प्रति 10 ग्रॅमसाठी झाली आहे. तर जाणून घ्या आजचे दर
मुंबईतील सोन्याचे आजचे दर:
22 कॅरेट सोने: 37,300 ₹
24 कॅरेट सोने: 38,300 ₹
पुणे येथील सोन्याचे आजचे दर:
22 कॅरेट सोने: 37,300 ₹
24 कॅरेट सोने: 38,300 ₹
नागपूर/नाशिक येथील सोन्याचे आजचे दर:
22 कॅरेट सोने: 37,300 ₹
24 कॅरेट सोने: 38,300 ₹
आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.दसराचा मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते. सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या.