Gold Rate Today: सोने हा शब्द जरी उच्चारला तरी, सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोने दर (Gold Prices) गुरुवारी (8 ऑगस्ट 2019) तब्बल प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचला. तर भाववाढीच्या स्पर्धेत आता चांदीही मागे राहिली नाही. गुरुवारी चांदीचा दरही (Silver Rate) प्रतिकिलो 44 हजार रुपये इतका झाला. मुंबई सराफा बाजारात आज सोने दरात 550 ते 600 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. तर, चांदीचीही चांगलीच चांदी (Silver) झाली.
मुंबई सराफा बाजारात बुधवारी (7 ऑगस्ट 2019) सोने दर 1 हजार 113 रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले होते. गेले काही दिवस सोने दरात कमालीची वाढ होत आहे. ही वाढ आता इतक्या टोकाला जाऊन पोहोचली आहे की, सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव पाहून आता सर्वसामान्यांनी सोने खरेदी कारयचे की, नुसतेच पाहायचे, अशी चर्चा नागरिकांत होऊ लागली आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध आणि गुंतवणूक विषयातले तज्ज्ञ सांगतात की, सध्यास्थितीत अमेरिका आणि चिन या आर्थिक दृष्ट्या मोठ्या बाजारपेठा असलेल्या देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन देशांमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याचा त्याचा परिणाम सोने दरात प्रचंड वेगाने वाढ होण्यात होत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणने आहे.
दरम्यन, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदार हे सोन्यात गुंतवणूक करत असताना भारतातील गुंतवणूकादही मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळ सहाजीकच भारतात सोने दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांची उसळी कायम आहे. ही उसळी आज मुंबई सराफाबाजारात प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले.