Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Gold Rate Today:  हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa), हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व देखील आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी अनेकजण या दिवशी गर्दी करतात. यंदा भारतावर कोरोना वायरसचं सावट असल्याने बाजारपेठा, दुकानं बंद आहेत पण नागरिकांना ऑनलाईन खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग यंदा ऑनलाईन सोने खरेदी च्या दिवशी पहा तुमच्या शहरात आज सोन्या, चांदीचा दर काय आहे? Happy Gudi Padwa Wishes 2021: गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी खास मराठी Images, Wallpapers, Messages, HD Images, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा हिंदू नववर्ष दिन.

दरम्यान सध्या कोरोना संसर्गाचा धुमाकूळ पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळत ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला सराफ दुकानंही अपवाद नाही. लॉकडाऊनच्या सावटाखाली असल्याने मुंबई शेअर बाजारासोबतच सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार पहायला मिळत आहे. सध्या सोन्याचे भाव 45 ते 46 हजारांच्या आसपास असल्याचं पहायला मिळालं आहे. Happy Gudi Padwa 2021 Simple Rangoli Designs: गुढी पाडव्याच्या दिवशी दारासमोर काढा 'या' सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाइन.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधील 24 कॅरेट सोन्याचे दर

Goodreturns वेबसाईटनुसार,

मुंबई - ₹45,750 (प्रति 10 ग्राम)

पुणे- ₹45,750 (प्रति 10 ग्राम)

नाशिक- ₹45,750 (प्रति 10 ग्राम)

नागपूर- ₹45,750 (प्रति 10 ग्राम)

रत्नागिरी- ₹45,750 (प्रति 10 ग्राम)

दरम्यान 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध समजलं जातं त्यामुळे ते सर्वाधिक किंमतीमध्ये विकलं जातं. मात्र दागिन्यांसाठी सोनं खरेदी करताना ती 23,22 कॅरेट सोन्यात केली जाते. त्यामुळे त्याचे दर 24 कॅरेटच्या तुलनेत कमी असतात. तसेच यावर घडणावळ, टॅक्स आकारून दागिना हातात येत असल्याने सहाजिकच प्रत्येक सराफा दुकानानुसार त्याचे दर बदलू शकतात.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधील चांदीचे दर हे प्रति किलो 67,200 रूपये आहेत. सोन्या सारखेच चांदीला देखील सणावाराच्या दिवशी विशेष महत्त्व असतं. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज चांदीचे, सोन्याचे दर थोडे वधारल्याचं चित्र सर्वत्र पहायला मिळाले आहेत.