
Gold Rate In Maharashtra: सोने खरेदी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. खास करुन महिलांमध्ये सोन्याचे दागिने विशेष लोकप्रिय. त्यामुळे सोने धातू खरेदी करताना तो गुंतवणूक किंवा बचत म्हणून करण्यापेक्षा, ती भावनिक नाते जोडूनच अधिक प्रमाणावर केली जाते. खास करुन विवाह, सण, उत्सव, वाढदिवस, मुहूर्त अशा या ना त्या कारणावरुन सोने खरेदीसाठी (Gold Price Today) कारण शोधले जाते. पण, अलिडील काही काळत या धातूचे दर सातत्याने वाढू लागल्याने ही खरेदी वाटते तितकी साधी राहीली नाही. दिवसागणीत सोने महाग होत चालल्याने हळूहळू ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ पाहात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने दर.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये प्रति 10 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने 58,450 रुपयांना विकले जात आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,760 रुपयांना विकले जात आहे. पुणे आणि नागपूर शहरातही सोन्याचे दर मुंबईतील सोने दराप्रमाणेच आहेत. नाशिक शहरात प्रति 10 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने 58,480 रुपये तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,790 रुपयांना विकले जात आहे. (हेही वाचा, World's Most Expensive Ice Cream: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video)
ठाणे, वसई विरार, कोल्हापूर, सोलापूर, येथे 22 कॅरेट सोने 58,450 रुपयांना विकले जात आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,760 रुपयांना विकले जात आहे. तर भिवंडी, लातूर, येथे 22 कॅरेट सोने 58,480 रुपयांना विकले जात आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,790 रुपयांना विकले जात आहे.
भारतातील प्रमुख शहरे असलेल्या, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबाद या शहरांचा विचार करता थोड्याफार फरकाने सारख्याच किमतीने सोने दर पाहायला मिळते आहे. चेन्नईमध्ये 69,150 रुपये इतक्या दराने 22 कॅरेटचे 10 ग्रॅम वजनाचे सोने विक्री होत आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 ग्रॅम सोने 64,530 रुपयांना विकले जात आहे. दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅम वजनाचे 22 आणि 24 कॅरेटचे सोने अनुक्रमे, 58,600 रुपये आणि 63,910 रुपयाांना विकले जात आहे. कोलकातामध्ये हेच सोने अनुक्रमे 58,450 आणि 63,760 रुपयांना विकल जात आहे. कोलकातामधील दराचा उल्लेख हा अनुक्रमे 22 आणि 24 कॅरेट सोन्यासंदर्भात आणि प्रति 10 ग्रॅम वजनासाठी आहे.
दरम्यान, येथे दिलेले सोने दर हे कोणत्याही करांशिवाय आणि गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीवर आधारीत आहेत. तुमच्या शहरातील आणि परिसरातील सोन्याचा अचूक दर पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी तुमचा सोनार किंवा सराफा व्यवसायिक यांच्याशी संपर्क करु शकता. अनेकदा सोन्याची मूळ किंमत आणि त्यात जीएसटी, स्थानिक कर यांचा समावेश झाल्याने त्यात बदल पाहायाल मिळतो.