Gold Price on Dussehra 2019: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचा भाव
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Gold Rate On  Dussehra 2019: काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सोन्याच्या दराने (Gold Rate) चाळीशी पार करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात चढ उतार होत राहिले. आता दसऱ्याच्या मुहुर्तावरही सोन्याच्या दरात अपेक्षेप्रमाणे घट झालेली दिसून येत आहे. दसरा (Dussehra) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने, या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. सध्या मुंबईच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर 38,300 प्रति तोळा तर चांदीचा दर 48,000 प्रति किलो असा चालू आहे.

मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याने चाळीशी पार करत 40,220.00 रुपये प्रति तोळा असा उच्चांक गाठला होता. मात्र आता सणासुदीच्या काळात काही प्रमाणात सोन्याचे दर उतरले आहे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोने 210 रुपये तेजीसह 39,075 रुपये प्रति 10 ग्रामवर थांबले. तर चांदीचा दर 46,490 रुपये प्रति किलोग्राम इतका होता. (हेही वाचा: Dussehra 2019 Date: यंदा दसरा, विजयादशमी कधी साजरी केली जाणार? पहा पूजा विधीचे शुभ मुहूर्त)

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे स्थान 0.05 टक्क्यांनी म्हणजेच 0.77 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते. त्याचबरोबर चांदीची किंमत 0.03 टक्क्यांनी घसरून 17.54 डॉलर प्रति औंसवर आली होती. अमेरिका-चीनमधील थेट राजकीय तणाव आणि चालू असलेल्या चर्चेतून होणाऱ्या सकारात्मक निराकरणाच्या आशेने, सोन्याच्या दरावर या आठवड्यात फरक पडू शकतो. या आठवड्यात सोन्याच्या दारात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.